Spiga

या निर्बुद्ध 'सकाळ' चे काय करायचे?

पुण्याच्या किंवा एकंदर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत 'सकाळ' चा फार महत्त्वाचा वाटा आहे, असा तमाम जनतेचा समज करून देण्यात खुद्द 'सकाळ'च आघाडीवर आहे. 'परुळेकर ते पवार' हा प्रवास 'पत्रकारिता ते पैसा' असा झाला आहे म्हटल्यास ते वावगे ठरू नये... 
- वाचा सन्जोप राव यांचा मनोगतमधील लेख.
(या लेखाखालील प्रतिक्रियाही वाचनीय आहेत. त्याही अवश्य वाचाव्यात.)

सकाळचा ढोल

सकाळमुळे फुटली ७३ विषयांना वाचा ही बातमी म्हणजे स्वतःचेच ढोल स्वतः वाजवून घेण्याचा प्रकार अाहे. येथे सकाळवर टीका करायचा उद्देश नाही, पण अशा बातम्या छापून पेपर आपले हसे करून घेतात असे मला वाटते. सकाळने या बातमीत म्हटले आहे, की

जनसामान्यांना भेडसावणाऱ्या विविध स्वरूपाच्या प्रश्‍नांना "सकाळ'ने वाचा फोडल्याने विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात दोन्ही सभागृहांत त्या प्रश्‍नांवर चर्चा होऊन अनेक प्रश्‍न मार्गी लागले. "सकाळ'ने मांडलेल्या मराठवाड्यातील सुमारे २५, तर पश्‍चिम महाराष्ट्रातील २९ प्रश्‍नांवर सभागृहात चर्चा झाली. "सकाळ'च्या विविध आवृत्त्यांनी मांडलेल्या ७३ प्रश्‍नांवर या अधिवेशनकाळात सभागृहात चर्चा झाली. यामुळे सरकारच्या कारभारावर "सकाळ'चा अंकुश कायम असल्याचे स्पष्ट झाले.
सकाळच्या या दाव्यात किती तथ्य आहे? सकाळ म्हणतो -
"सकाळ'च्या सर्व आवृत्त्यांनी कायदा-सुव्यवस्थेपासून वाहतुकीपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वच घटकांचे प्रश्‍न सातत्याने मांडले. याचाच परिणाम म्हणून नागपूर अधिवेशनात सातत्याने "सकाळ'ने दिलेल्या बातमीवर चर्चा झडल्या.
परंतु हे प्रश्न काय केवळ सकाळच मांडत होता काय? अन्य पेपर काय झोपा काढत होते काय? सकाळने उदाहरणे म्हणून ज्या बातम्या दिल्या आहेत, तशा बातम्या बाकीच्या पेपरांतपण आल्या होत्या. सकाळ म्हणतो -
कायम अनुदानातील शिक्षण संस्थांच्या नावातील "कायम' हा शब्द रद्द करावा, पनवेल येथे स्कूल बसला लागलेली आग या "सकाळ' मुंबई आवृत्तीच्या बातम्यांचीही दखल सभागृहाने घेतली.
पनवेलमध्ये स्कूल बसला आग लागली ही काय सकाळची एक्स्लुजिव बातमी होती काय?  खरे म्हणजे अशा बातम्या अन्य पेपरांतपण येत होत्या. त्यांचा एकत्रित परिणाम म्हणून हे प्रश्न सभागृहात उपस्थित झाले. यातील एखादी बातमी सकाळची स्पेशल बातमी असेलही. पण सरसकटपणे आपल्या बातम्यांवरुनच सरकार हलले असे म्हणणे योग्य नव्हे, असे वाटते. हे सकाळचे स्वतःचेच ढोल पिटणे आहे, असे वाटते. आपल्याला काय वाटते?
- एक पत्रकार

तंबी दुराई त्यांच्या स्तंभलेखनाविषयी...

‘लोकसत्ता’चे सहसंपादक व ‘दोन फुल एक हाफ’चे स्तंभलेखक तंबी दुराई यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम २ जानेवारी रोजी प्रभादेवी येथील ‘पु. ल. देशपांडे कला अकादमी’च्या सभागृहात झाला. अनिवासी भारतीय पालक संघटनेकडून त्यांची ही मुलाखत आयोजिण्यात आली होती.
बरोबर दहा वर्षांपूर्वी, २ जानेवारी २००० रोजी या सदरास सुरुवात झाली. हा स्तंभ कसा सुरू झाला, त्यातील विषय कसे निवडले गेले आणि सलग दहा वर्षे हा स्तंभ वाचकप्रिय का झाला, याचा मागोवा या मुलाखतीतून तंबी दुराई (श्रीकांत बोजेवार) यांनी घेतला.
त्या मुलाखतीचा अंश लोकसत्तेच्या सौजन्याने येथे देत आहोत :

माझे बालपण व सुरुवातीची काही वर्षे दिग्रस आणि यवतमाळ येथे गेली आणि पुढील काळ मुंबईत गेला. यामुळे अनेक माणसे जवळून बघता आली आणि त्यांच्या प्रवृत्ती समजून घेता आल्या. `दोन फुल एक हाफ’ या साप्ताहिक सदरातून माणसांच्या प्रवृत्तींवर, विशिष्ट परिस्थितीत ते नेमके कसे वागतात यावर मी टीका-टिप्पणी करतो. त्याला त्या काळाचा, परिस्थितीचा नेमका संदर्भ असतो यामुळेच ते वाचकाला जुने, संदर्भहीन बोजड न वाटता अगदी ताजेतवाने वाटते.

हा स्तंभ कोणत्याही एका धाटणीत न लिहिता तो वेगवेगळ्या धाटणीत वाचकांसमोर कसा येईल याचा विचार मी सुरुवातीपासूनच केला होता. त्यामुळेच त्यासाठी ‘कविता’, ‘ओवी’, ‘पोवाडा’, ‘लावणी’, ‘बालगीत’ हे साहित्याचे वेगवेगळे प्रकार निवडले यामुळे वाचकाला त्याचा कधी कंटाळा आला नाही. यामुळेच गेली दहा वर्षे हे सदर नियमितपणे चालू आहे. महाराष्ट्रातील राजकारणी व येथील वाचक हे चोखंदळ आहेत. त्यांच्या सहकार्यामुळेच हे लिखाण मी करू शकलो.

या स्तंभातून मी कुठेही विशिष्ट एका पक्षाचा आहे, अशा प्रकारे लिहीत नाही त्यामुळेच त्याला राजकारणीदेखील दिलखुलास दाद देतात. महाराष्ट्रातील सर्व राजकारणी- नेते या स्तंभाचा ताजेपणा टिकावा म्हणून धडपडत असतात. त्यामुळे या लिखाणाचा कधीही कंटाळा येणार नाही!

सामनाकारांची धोरणे
- कपिल केळकर

तेलंगणाच्या मुद्द्यावर सामनामध्ये आज (११/१२) अग्रलेख नाही. साधा लेखही नाही. गोची झालेली दिसते... (Link)

दादागिरीचं माध्यम म्हणून वर्तमानपत्रं वावरतायत! : दिपु

आपल्याकडे टिळकांच्या काळापासून किंवा प्रिंटिंग आल्यापासून दादागिरीचं माध्यम म्हणून वर्तमानपत्रं वावरतायत. आणि वर्तमानपत्र हा एक प्रकारचा माफिया बनतो शेवटी. आणि त्यांचा विरोध करणं आवश्यक आहे. नाही तर आपल्याला सांस्कृतिक जीवन कठीण जाईल...

मी मध्यप्रदेशात असतानासुद्धा अनेक वाद माझ्याभोवती निर्माण करण्यात आले. म्हणजे काही लोकांनी मुद्दाम केले. नंतर मी केलेल्या स्टेटमेंटसची हिंदी वृत्तपत्रांनी दखल घ्यायला सुरुवात केली होती. मी 'वागर्थ'चा डायरेक्टर असताना, उदाहरणार्थ प्रख्यात हिंदी कवी रघुवीर सहाय यांनी 'चित्रेजी को एतराज' असं हेडिंग असलेलं संपादकीय लिहिलेलं आहे. ते कशाविषयी, तर मी भोपाळमध्ये असं भाषणात बोललो की, वर्तमानपत्रात इतक्या संस्कृत्या आहेत की कवितेविषयीची, साहित्याविषयीची किंवा कलेविषयीची बातमी त्यात क्वचितच येते. वस्तुतः ही क्षेत्रसुद्धा तुमच्या फ्रंटपेजवर असली पाहिजेत. त्यांनासुद्धा हेडलाईन्स द्यायला पाहिजेत. पण ह्या मूल्यव्यवस्थेमध्ये हा बत्तीस नंबरचा आयटेम आहे असं तुम्ही ट्रीट करताय त्याला. तर हे बरोबर नाही. आता हे रघुवीर सहाय खोचक शैलीमध्ये आणि चांगलं लिहायचे. तर रघुवीर सहायनी ह्याला हेडलाईन दिली, की 'चित्रेजी को एतराज'. त्यांच्या लक्षात आलं नाही की, हे कॉंट्रॅडिक्ट केलंय त्यांनी. त्या अग्रलेखामुळे माझं म्हणणं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यांनी काय म्हटलं, की 'चित्रेजींना याचा राग येतो, पण मी जर्नालिस्ट म्हणूनही काम करतो आणि जर्नालिस्टला इतर ठिकाणी लक्ष द्यावं लागत असतं. अमुकतमुकचा चित्रेजींना राग का यावा? आणि कवींना का हेडलाईन्सचा सोस असावा?' तर मला कोणीतरी म्हणालं की, 'आता काय याचं?' मी म्हटलं, 'ठीक आहे. रघुवीर सहायनी माझं म्हणणं मान्य केलं आहे. 'चित्रेजी को एतराज' या हेडिंगनेच जर का अग्रलेख आला तर आणखी काय पाहिजे?'


...नंतर एक विडंबनासारखा किंवा विनोदी टाईपचा एक लेख आहे. भोपाळच्या एका मॅगॅझिनमधला. त्याच्यात भारत भवनची नालस्ती केलेली आहे. दुसरा आणखी वाद म्हणजे मी काय म्हटलंय हे गृहीत धरून - म्हणजे करंदीकर, बापट आणि पाडगावकर सर्कस वगैरेच्या लेव्हलला... मग तो वाद त्यांनी निर्माण केला. त्यातसुद्धा मी भाग घेतला नाही. कारण मूळचं माझं म्हणणं जर का विपर्यस्त रूपात मांडलेलं असेल तर काय? पण मी म्हटलं, जर्नालिझमची मूलभूत जबाबदारी आपण पाळत नाही. टिकेकरला - इथं तो इंटरनॅशनल बुक हाऊसमध्ये भेटला तेव्हा हटकलं - सगळ्यांना ऐकू जाईलसं - 'टिकेकर, तुम्ही हलकट संपादकीय लिहायचं कधी थांबवणार?' कारण अरुण कोलटकर हे उनाडक्या करत हिंडत असतात वगैरे, असं त्याने अग्रलेखात लिहिलं होतं. काही संदर्भ नसताना. 'ह्यांचे मित्र अरूण कोलटकर म्हणून.' आता कॉमनवेल्थ ऍवॉर्ड मिळालेला मनुष्य, तुला त्याची किंमत कळत नसेल, उनाडक्या करत हिंडत असतो म्हणजे? आणि साडेतीन लाख किंवा तीन लाख वाचकांना अरुण कोलटकर माहित नसताना त्याची एक विकृत प्रतिमा तयार करून त्यांच्याकडे तुम्ही देणार. त्यातल्या वाचकांपैकी फक्त शंभर-दोनशे त्याला ओळखत असतील. तर मी म्हटलं, ही गुंडगिरी आहे. टेररिझम आहे हा एक प्रकारचा. दादागिरी आहे. आणि ह्या दादागिरीची सुरुवात लोकमान्य टिळकांनीच केली होती. ही मराठी जर्नालिझमची परंपरा आहे. त्यात आपण जाऊन बसलो. पण हे अशा त-हेचं आपल्याकडे झालेलं आहे. एक लोकांना माहीत नाही की ज्या वेळेला जोतिबा फुले वारले त्या वेळेला ती बातमी पण नाही आली किंवा त्यांच्यावरती एखादा अग्रलेख सुधारक मध्ये आला नाही. आगरकरांनी त्यांची दखलसुद्धा घेतली नाही. आता आगरकरांबद्दल विचार करणा-या सगळ्या लोकांनी ह्याचं आपल्याला एक्स्प्लनेशन द्यावं. आपल्याकडे जर्नालिझमचे असे उपयोग पहिल्यापासून झालेले आहेत....


(संदर्भ - कवितेबाहेरचा कवी - दि. पु. चित्रे यांची मुलाखत - प्रदीप कर्णिक, समकालिन संस्कृती, दिवाळी ९६, पा. १७१, १७३-७४)

तंबीची गोष्ट

लोकसत्तातील २ फुल्ल १ हाफ हा एक गाजणारा कॉलम. या कॉलममधील निवडक लेखांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. थोड्याच कालावधीत या पुस्तकाला ३ पुरस्कार मिळाले. त्यानिमित्ताने एक लेख देखील लोकसत्तात येऊन गेला. त्या अनुषंगाने हा लेख...
(ह्या लेखातील काही संदर्भ, विशेषणे ही तंबी दुराईंच्या पुस्तकातील प्रस्तावना व लेखकाचे मनोगत याला अनुसरुन घेतलेली आहेत.)
- विनायक (वॉंट टू टॉक)
(संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वागळे, आयबीएनवरील हल्ला आणि पत्रकारिता

साधारणत: दीड वर्षापूर्वी आयबीएन लोकमत सुरू झाले. त्यावेळी वागळे आणि सरदेसाई असे
दोन दमदार चेहरे, वेगळे कार्यक्रम, नेमकेपणा इ. मुळे मीदेखील आयबीएनचा फॅन झालो
होतो. ''आजचा सवाल'' कार्यक्रम, त्यात डायरेक्ट केली जाणारी भांडाफोड यामुळे वागळे
सामान्य जनतेला थोड्याफार प्रमाणात हिरो वाटायला लागले होते. आपला आवाज कोणीतरी आहे
असे वाटायला लागल होत.निदान मला तरी ते हिरो वाटायला लागले होते. हा माणूस काहीतरी
वेगळे करून दाखवणार अशी खात्री वाटत होती. पण, हळूहळू भ्रमनिरास झाला....

ब्लॉगर विनायक पाचलग यांचा पत्रकारिता - एक गहन प्रश्न हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.